विनोदी-थरारपट प्रकारात मोडणारा ‘चीटर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता वैभव तत्ववादी प्रमुख भूमिकेत दिसेल. ‘शॉर्टकट’ चित्रपटात कॉम्प्युटर हॅकरची, ‘मिस्टर अॅण्ड मिसेस सदाचारी’ चित्रपटात तडफदार महाविद्यालयीन विद्यार्थाची भूमिका साकारणारा वैभव या चित्रपटात एका भामट्याची भूमिका साकारताना दिसेल. सदर भूमिका योग्यप्रकारे साकारण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतल्याचे समजते. चित्रपटात वैभव लोकांना कशाप्रकारे फसवतो हे पाहाणे त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजक ठरेल. ‘स्विस एन्टरटेन्मेंट’ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय फणसेकर यांचे असून, चित्रपटाची कथादेखील त्यांनीच लिहिली आहे. हृषिकेश जोशी, वैभव तत्ववादी, असावरी जोशी, सुहास जोशी आणि पूजा सावंत यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटातील कलाकारांच्या नावावरून नजर टाकता हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांची करमणूक करणारा ठरेल असे वाटते. २२ एप्रिल २०१६ रोजी ‘चीटर’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2016 रोजी प्रकाशित
पाहा : ‘चीटर’ वैभव तत्ववादी!
विनोदी-थरारपट प्रकारात मोडणारा ‘चीटर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-03-2016 at 17:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav tatwawadi transitions from being a hacker to a cheater