‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ या आगामी मराठी चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते चित्रपटाच्या सीडीचं प्रकाशन करण्यात आलं. म्युझिक लाँचच्या वेळी या सिनेमाची संपूर्ण टीम आणि विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर आवर्जून उपस्थित होते. चित्रपटाचे पोस्टर लाँच व चित्रपटातील गीतांची झलक याप्रसंगी दाखविण्यात आली. वेगवेगळ्या जॉनरची ४ धमाकेदार गाणी ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ मध्ये ऐकायला मिळणार आहेत. कथानकाला साजेशी अशी सिनेमातली गाणी असून प्रफुल कार्लेकर व मधु कृष्णा या द्वयीने संगीत दिलंय.
यातल्या ‘रेशमी रुमाल’ या तडफदार आयटम साँगवर भाऊ कदम, गिरीजा जोशी, चिन्मय उदगीरकर, आरती सोलंकी यांनी ताल धरलाय. शिवाय ‘तूच तू’ हे एक रोमँटिक गाणं व ‘पप्पी दे’ हे प्रसिद्ध गाणंही या सिनेमात आहे. ‘वाजलाचं पाहिजे’ हे धमाल टायटल साँग ही सगळ्यांना आवडेल असचं आहे. मंदार चोळकर व हरिदास कड यांनी चित्रपटातील गाणी शब्दबद्ध केली असून आदर्श शिंदे, रेश्मा सोनावणे, अवधूत गुप्ते, आनंदी जोशी रोहित राऊत व प्रवीण कुंवर यांचा स्वरसाज या गीतांना लाभला आहे.
चॅनल यू इन्टरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ हा सिनेमा विनोदी ढंगाचा आहे. चित्रपट तयार करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि चित्रपट निर्मिती कशा प्रकारे होते यावर गमतीशीर भाष्य करणारं या चित्रपटाचं कथानक आहे. भाऊ कदम, राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोलंकी संजय मोहिते आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. लवकरच हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा