आज १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. आजचा दिवस हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आजच्या दिवशी लोक आपल्या साथीदारासोबत घालवतात आणि प्रेम व्यक्त करतात. याच दिवसानिमित्ताने बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने पत्नी जिनिलियाला व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. पण त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रितेशने नक्की शुभेच्छा दिल्या आहेत की त्या दोघांमध्ये काही बिनसलं आहे असा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, त्यांचा हा मजेशीरल व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश आणि जिनिलिया घरी असल्याचे दिसून येत आहे. रितेशने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर जिनिलियाने नाईट ड्रेस परिधान केला आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला सोचता हूँ कि वो कितने मासूम थे हे गाणं प्ले होत आहे. एकीकडे हे गाणं सुरु आहे तर दुसरीकडे रितेश आणि जिनिलिया दु:खी दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत ‘हॅपी व्हेलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा’, असे कॅप्शन रितेशने दिले आहे.

IShowSpeed performs daring backflip on Guatemalas Hand of God‘You have to stop risking your life for these reels
१७ सेकंदाच्या व्हिडीओसाठी युट्युबरने गमवला असता जीव! ‘हँड ऑफ गॉड’वर केली स्टंटबाजी, थरारक Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
A old man strangles a dog
‘त्याने प्राण्याचा जन्म घेऊन चूक केली?’ भररस्त्यात श्वानाला गळफास लावला… ; धक्कादायक VIDEO पाहून संतापले नेटकरी
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू

आणखी वाचा : रितेश देशमुखचा ‘नाच’ पाहून जिनिलिया संतापली, मजेदार Video Viral

आणखी वाचा : ‘पुष्पा’च्या श्रीवल्ली गाण्याची परदेशातही क्रेझ, इंग्लिश व्हर्जनचा व्हिडिओ व्हायरल

रितेश आणि जिनेलियाने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ९ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले. यंदाच्या वर्षी त्यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. जिनेलियाला खरी लोकप्रियता ही २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून मिळाली. जिनेलियाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही काम केले आहे. मात्र, लग्नानंतर जिनेलियाने चित्रपटात काम केले नाही. त्यांना दोन मुलं असून रियान आणि राहिल अशी त्यांची नावं आहेत.

Story img Loader