सध्या टेलव्हिजन मालिकांच्या विश्वात झी युवा ही वाहिनी युवा प्रेक्षकांच्या मनात चांगलेच घर करुन राहिली आहे. या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या विविध धाटणीच्या मालिकांनी अनेक नव्या दमाच्या कलाकारांना एक नवी ओळख दिली आहे. झी युवावरील अशाच एका मालिकेतील प्रसिद्ध चेहरा म्हणजे युवा अभिनेत्री मिताली मयेकरचा. ‘फ्रेशर्स’ या मालिकेतील ‘सायली’ ही भूमिका साकारणाऱ्या मिताली मयेकर हिने तिच्या भूमिकेद्वारे आजच्या युथवर एक प्रकारची मोहिनीच घातली आहे. आजची तरुणाई सायलीच्या प्रेमात आहे. आपली प्रियसीही सायली सारखीच सुंदर, हुशार आणि बिनधास्त असावी. तिच्याबरोबर आपल्याला बऱ्याच गोष्टी शेअर करता आल्या पाहिजेत अशा काहीशा कल्पनांमध्ये आजची तरुणाई स्वप्न बघत आहे. तिच्या चाहत्यांची संख्यासुद्धा दिवसें दिवस वाढत आहे. झी युवावरील ‘फ्रेशर्स’ या नव्या मालिकेमुळे तिने अनेक चाहते कमावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॅलेन्टाइन्स डे म्हणजे प्रेमी युगुलांचा दिवस. पण आपल्या आयुष्यात अशा काही खास व्यक्ती असतात ज्या आपल्या अगदी जवळच्या असतात, आणि अशा काही खास व्यक्तींसोबत देखील आपण व्हॅलेन्टाइन्स डे साजरा करतो. फ्रेशर्स फेम मिताली मयेकरची व्हॅलेंटाइनसुद्धा तितकीच खास आणि तिच्या अगदी जवळची आहे आणि ते म्हणजे तिचे पेट्स डोरा आणि जिप्सी. तिच्या या अनोख्या व्हॅलेंटाइनबद्दल विचारल्यावर मिताली म्हणाली, “मी व्हॅलेन्टाइन्स डे हा नेहमी माझ्या पेट्स डोरा आणि जिप्सी सोबत साजरा करते. हा दिवस फक्त आमच्या तिघींचा असतो. मी त्या दोघींना घेऊन बाहेर फिरायला जाते, त्यांच्यासाठी गिफ्ट्स घेते. त्यांना आईस्क्रिम खूप आवडतं म्हणून आम्ही आईसेक्रिम पार्टी करतो. धमाल मज्जा मस्ती करत आमचा व्हॅलेन्टाइन्स डे कसा जातो हे आमचं आम्हालाच कळत नाही. माझ्या मते हे मुके जीव तुम्हाला जितका जीव लावतात आणि प्रेम करतात तितकं कोणीच करू शकत नाही. माझ्यासाठी हे खर अनकंडिशनल लव्ह आहे आणि डोरा व जिप्सी माझे बेस्ट व्हॅलेन्टाअन्स आहेत.”

बेधडक आणि बिंधास ‘फ्रेशर्स’ फेम मिताली मयेकर हिने कमी वेळातच तिच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मिताली ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीस तर आलीच पण काही दिवसांपूर्वीच ती ठाणेकरांना एका वेगळ्या माध्यमातून भेटली. बाळकूम ठाणे येथे १९ मार्चला झालेल्या पिंकथॉनचा मिताली हिस्सा बनली होती. महिलांचे सशक्तीकरण हा उद्देश असलेले पिंकथॉन ठाण्यात देखील आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मिलिंद सोमण व सोनाली कुलकर्णी या दिग्गजांसोबत मितालीने आजच्या युथचे प्रतिनिधित्व केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day 2017 special freshers fame mitali mayekars unique valentines date