व्हॅलेंटाइन डे म्हणजे एक असा दिवस ज्या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहात असतात. अर्थात या अनेकजणांमध्ये वयाची, जाती धर्माची, रंगवर्णाची अशी कोणतीही मर्यादा नसते हेच खरं. प्रेमाचा उत्साह, प्रेमाचा रंग आणि एका वेगळ्याच जगताची सुखद अनुभूती देणारा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनांची देवाणघेवाण होते आणि थोडेसे रुसवे फुगवेही असतातच. तुमच्या आमच्याप्रमाणेच कलाकारांच्या प्रेमाचेही असेच काहीसे किस्से आणि तारखांमध्ये गुंतलेल्या प्रेमाच्या आठवणी आहेत. सेलिब्रिटींच्या याच काही सुरेख आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने यंदा सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या गावी एक फेरफटका मारायलाच हवा… चला तर मग साजरा करुया उत्साह प्रेमाचा.

रश्मी अनपट आणि अमित खेडेकर
मी आणि अमित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या ऐतिहासिक नाटकात एकत्र होतो. आमची पहिली भेट या नाटकातून झाली. अमित त्यात संभाजीचं आणि मी येसूबाईचं कॅरॅक्टर प्ले करत होती. जशी जशी आमची ओळख वाढली आमची मैत्री अजूनच घट्ट होत गेली, मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि अमितने मला एके दिवशी प्रपोज केलं. २ वर्षांच्या रिलेशनशिप नंतर आम्ही २६ डिसेंबर २०१३ला विवाहबंधनात अडकलो. व्हॅलेंटाईन्स डे हा आम्हा दोघांसाठी देखील खूप स्पेशल असतो आणि आम्ही दोघेही तो एकमेकांसाठी स्पेशल आणि मेमोरेबल बनवतो. अमितने मला व्हॅलेंटाईन्स डेला दिलेलं सर्वात बेस्ट सरप्राईज म्हणजे त्याने मला गिफ्ट केलेले डायमंड इयरिंग्स. हे गिफ्ट माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे.

rashmi-anpat-1