धमाकेदार डान्सने साजरा होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे
स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘दुहेरी’मालिकेत यंदाचा व्हॅलेंटाईन डे दणक्यात साजरा होतो आहे. या मालिकेतले दुष्यंत आणि मैथिलीचे जुळणारे सूर सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहेत. त्यांच्या या बहरणाऱ्या नात्याला यंदाच्या व्हॅलेंटाईन डे मध्ये एक वेगळा आयाम मिळणार असून या दोघांचा एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स १४ फेब्रुवारीला रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या डान्स परफॉर्मन्सची छोटी झलक सोशल मिडियावर शेअर करण्यात आली असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मराठीतील अनेक सेलिब्रिटींनी या व्हिडिओची लिंक शेअर केली आहे.
तसेच ही लोकप्रिय जोडी दुष्यंत म्हणजे संकेत पाठक आणि मैथिली म्हणजे सुपर्णा श्याम थेट प्रेक्षकांसोबत संवाद साधणार आहेत. उद्या दुपारी १ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधतील. तेव्हा यंदाचा व्हॅलेंटाईन डे दुष्यंत आणि मैथिलीच्या साथीने प्रेक्षकांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.