ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते सध्या खूप चर्चेत आहेत. एकाबाजूला त्यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं कौतुक होतं आहे. या चित्रपटात वंदना गुप्तेंसह अशोक सराफ झळकले आहेत. तर दुसऱ्याबाजूला वंदना गुप्ते यांचं ‘कुटुंब किर्रतन’ नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. या नाटकात वंदना गुप्तेंसह संकर्षण कऱ्हाडे व तन्वी मुंडले प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. अशातच वंदना यांनी संकर्षण व तन्वीला खास वस्तू दिली. यासंदर्भात संकर्षणने नुकतीच पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नेहमी दैनंदिन जीवनातल्या गोष्टी शेअर करत असतो. त्याच्या प्रत्येक पोस्टची चर्चा होतं असते. नुकतंच त्याने वंदना गुप्ते यांनी दिलेल्या खास वस्तूबरोबर फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. वंदना गुप्ते यांनी हँड्स फ्री ब्लेडलेस पर्सनल मिनी फॅन संकर्षण व तन्वीला दिला आहे.

संकर्षण कऱ्हाडे पोस्ट करत म्हणाला, “उगाच नाही वंदना गुप्तेंचे सगळे फॅन्स होतं…’कुटुंब किर्रतन’ नाटकाचे आता दौरे सुरी होतील…उन्हाळ्यात प्रवास करायचाय म्हणून त्यांनी आम्हा तिघांना आज हे फॅन्स दिले…गळ्यात अडकवायचे अन् पाहिजे तेवढी हवा खायची…आहे की नाही मज्जा…वंदना गुप्ते थँक्यू.”

दरम्यान, संकर्षण कऱ्हाडेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी सिनेसृष्टीतील आघाडींच्या अभिनेत्यांमध्ये संकर्षणचं नाव आवर्जुन घेतलं जात. त्याला अभ्यासू अभिनेता म्हणून ओळखलं जात. अभिनया व्यतिरिक्त संकर्षणच्या कविता आणि त्याचं उत्कृष्ट सूत्रसंचालन या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडतात.

सध्या संकर्षण नाटकांसह वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळत आहे. संकर्षणचं ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ ही नाटकंदेखील रंगभूमीवर जोरदार सुरू आहेत. तसंच त्याचं ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रम प्रेक्षकांचा खूपच आवडला आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी प्रेक्षक हाउसफुल्ल गर्दी करताना पाहायला मिळत आहेत.