नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बकिंमचंद्र चटर्जी लिखित ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा नव्या स्वरुपात देश बांधवांच्या भेटीला येत आहे. गायक – संगीतकार ऋग्वेद देशपांडे व ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ची प्रस्तुती असलेल्या या राष्ट्रभक्ती जागविणाऱ्या गीताचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पश्चिम येथील युनिव्हर्सल म्युझिक ग्रुपच्या कार्यालयात करण्यात आले.
या नव्या गीतांचे संगीत ऋग्वेद देशपांडे यांनी केले असून, संगीत संयोजन वरद खरे यांनी केले आहे. आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, अनघा ढोमसे आणि ऋग्वेद देशपांडे यांनी या गीतात आपला स्वर मिसळला असून, सतारवादक शेखर राजे आणि प्रसाद रहाणे यांच्याबरोबर बासरीवादक डॉ. हिमांशू गींदे यांनी साथसंगत केली आहे.
या गाण्याचे रेकॉर्डिंग ठाण्यात ऋग्वेद देशपांडे यांच्याच ‘आरडी म्युझिक’ या स्टुडिओत झाले असून, व्हिडिओ स्वरुपातील गीत ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’ ने तयार केले आहे. या व्हिडिओ गीताचे दिग्दर्शन सुमेध समर्थ यांनी केले आहे. वंदे मातरम हे संपूर्ण काव्य आजच्या तरुणाईच्या विस्मरणात जाऊ नये आणि आपल्याला कलात्मकतेने आपल्या भारत मातेला वंदन करता यावे, असा दुहेरी हेतू या गाण्याच्या निर्मिती मागे आहे, असे संगीतकार ऋग्वेद देशपांडे यांनी सांगितले. तर आजचे कलावंत आणि तरुणाई देशाविषयी खूपच सजग आहे आणि म्हणूनच हे देशाभिमान उंचावणारे राष्ट्रीय गीत आम्ही देशबांधवासाठी
विनामूल्य बहाल करीत आहोत, असे ‘युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप’च्या वतीने मंदार गुप्ते यांनी सांगितले.
‘वंदे मातरम’चा नवा अविष्कार रसिकांच्या भेटीला
नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत बकिंमचंद्र चटर्जी लिखित 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गीत पुन्हा एकदा नव्या स्वरुपात देश बांधवांच्या भेटीला येत आहे.
आणखी वाचा
First published on: 21-08-2013 at 04:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vande mataram song in new voice music