‘द ग्रेट इंडियन किचन’ या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयन लवकरच मराठीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘हवाहवाई’ची असून यामध्ये दिग्गज कलाकारांची मांदियाळी असणार आहे. निमिषासह वर्षा उसगावकर, सिद्धार्थ जाधव, समीर चौघुले अशा दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर मुंबईतील शिवाजी पार्क येथे फूड स्टॉल चालविणाऱ्या महिलांच्या हस्ते लाँच करण्यात आले.
“…अन् अचानक पोलिसांची व्हॅन आली”; रवी जाधव यांनी सांगितला ‘टाइमपास ३’ चित्रपटाच्या शुटिंगचा किस्सा
मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी ‘हवाहवाई’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी या चित्रपटातलं उडत्या चालीचं एक गाणं हवाहवाईमध्ये गायलं आहे. गायिका उर्मिला धनगर हिच्या ठसकेबाज आवाजातही एक उत्तम गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे. चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून चित्रपटातील गीते महेश टिळेकर यांनी लिहिली आहेत.
टाइमपास 3 करताना कोणती आव्हाने आली? ऋता दुर्गुळे म्हणाली “पालवी म्हणून मी…”
मल्याळम चित्रपटांमध्ये निमिषा संजयननं सशक्त अभिनेत्री म्हणून ओळख मिळवली आहे. आता हवाहवाई या चित्रपटाद्वारे ती मराठी चित्रपटांत पदार्पण करत आहे. तिच्यासह अभिनेत्री वर्षा उसगावकर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन या कलाकारांनी विविध भूमिका हवाहवाई चित्रपटात साकारल्या आहेत.