अभिनेता वरुण धवन आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलणं बरेचदा टाळतो. तो इंटेरिअर डिझायनर नताशा दलालला डेट करत असल्याच्या चर्चा बॉलिवूडमध्ये होत्या पण वरुणनं ते कधीही खुलेपणानं मान्य केलं नाही. शक्यतो नताशा कोणाच्याही नजरेस येणार नाही याची काळजी अनेकदा वरुण घेतो. मात्र अखेर कॉफी विथ करणच्या मंचावर त्यानं नाताशसोबतचं आपलं नातं मान्य केलं आहे.
मी आणि नताशा एकमेकांना डेट करतो आणि मी तिच्याशी लग्नही करणार असल्याचं वरुणनं दिग्दर्शक करण जोहर समोर कबुल केलं. वरुण आणि नताशा पुढील वर्षांत विवाहबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जातं आहे. नताशा आणि वरुण एकमेकांना कित्येक वर्षांपासून डेट करत आहेत. मात्र तो तिच्याबदद्ल बोलणं नेहमीच टाळतो. याचं कारणही त्यानं सांगितलं. ‘नताशाला प्रसिद्धीझोतापासून लांब राहणं आवडतं. ती एक सामान्य मुलगी आहे आणि तिला सामान्य मुलीसारखंच आयुष्य जगायचं आहे. तिच्या इच्छेचा मी मान राखतो किंबहुना ते माझं कर्तव्य आहे. म्हणूनच मी तिच्याबद्दल बोलणं टाळतो” असं तो म्हणाला होता.
मात्र कॉफी विथ करणच्या निमित्तानं का होईना पहिल्यांदाच वरुणनं टीव्हीवर आपल्या नात्याची कबुली दिली आहे.