बॉलीवूडचा हिरो वरूण धवन त्याच्या आगामी हम्प्टी शर्मा की दुल्हनिया चित्रपटातील सॅटर्डे सन्डे गाण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी त्याने अमेरिकन अभिनेता आणि कुश्तीपटू ड्वेन जॉनसनसारखा (द रॉक) टॅटू काढला आहे.
ड्वेनप्रमाणे त्याने छाती, खांदा आणि बाहूवर येईल इतका मोठा टॅटू गोंदवून घेतला आहे. वरुणने आपला हा नवीन लूक ट्विटरवर पोस्ट केला असून त्यात द रॉकलाही टॅग केले आहे. फास्ट अॅण्ड फ्युरिअर अभिनेता ड्वेननेही वरूणची प्रशंसा केली असून अभिमानाने तो टॅटू ठेवण्यास सांगितले आहे. हे पहिल्यांदाच नाही जेव्हा वरुणने रॉकबद्दल असलेले आपले प्रेम दाखविले आहे. यापूर्वी कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमातही त्याने मै तेरा हिरोच्या प्रमोशनवेळी रॉकचे अनुकरण केले होते.