बॉलीवूड अभिनेता वरूण धवनने आपल्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ चित्रपटाच्या शेवटी चित्रपटातील एका प्रसंगाचे चित्रीकरण करताना गरज लक्षात घेता चक्क मद्यपान केले.
याआधी ‘किंग खान’ शाहरूखसोबत ‘देवदास’ चित्रपटात मद्यपान करुन एक प्रसंग चित्रीत करण्यात आला होता. त्यानंतर आता वरूण धवनने हम्प्टी शर्मा की दुल्हनियामध्ये एका प्रसंगासाठी मद्यपान करून चित्रिकरण केले. वरुण म्हणाला की, चित्रपटात एका प्रसंगात मला मद्यपान केलेल्या अवस्थेत संवाद साधायचा होता. त्यासाठी प्रत्यक्षात मद्यपान करून चित्रीकरण करण्याचे धाडस मी केले आणि विशेष म्हणजे, त्या दिवशी पहाटे चार वाजता चित्रीकरण करण्यात आले होते. म्हणजे, पहाटे चार वाजता मद्यपान करून चित्रीकरणाला सामोरे जाणे काय असते याचा विचार तुम्ही करू शकता.” असेही वरुण म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jul 2014 रोजी प्रकाशित
‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’साठी वरुणने केले मद्यपान!
बॉलीवूड अभिनेता वरूण धवनने आपल्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' चित्रपटाच्या शेवटी चित्रपटातील एका प्रसंगाचे चित्रीकरण करताना गरज लक्षात घेता चक्क मद्यपान केले.

First published on: 15-07-2014 at 04:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan got drunk for humpty sharma ki dulhanias climax