‘द रॉक’ नावाने प्रसिद्ध असलेला हॉलिवूड अॅक्शन हिरो ड्वेन जॉन्सनने बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचे वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार मानले आहेत. जॉन्सनचा २ मेला वाढदिवस होता. अभिनेता वरुणने त्याला टि्वटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. जन्मदिवसाच्या शुभेच्छा बिग मॅन. माझी प्रेरणा, मनोरंजन क्षेत्रातील सर्वात रोमांचक व्यक्ती, असा शुभसंदेश वरुणने टि्वटरवर पोस्ट केला. ‘फास्ट अॅण्ड फ्युरियस’ चित्रपटातील अभिनेता जॉन्सननेदेखील टि्वटरवरून वरुणला शुभेच्छांसाठी धन्यवाद दिले. वरुणला धन्यवाद देण्याबरोबरच वाढदिवसानिमित्त भारतीयांनी दर्शविलेल्या प्रेमापोटीदेखील जॉन्सनने भारतीयांचे आभार मानले. लवकरच वरुणचा ‘एबीसीडी २’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Story img Loader