varun-450बॉलिवूडमधील उगवता तारा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवनचा मुलगा वरुण धवन ‘बदलापूर’ चित्रपटानंतर ‘एबीसीडी-२’ चित्रपटात दिसणार असून, त्याने आपले लक्ष या चित्रपटावर केंद्रित केले आहे. ‘बदलापूर’ हा त्याचा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची सर्व स्तरातून वाखाणणी होत आहे. ‘बदलापूर’च्या यशात मग्न न राहता पुढच्या प्रवासाला सुरुवात करण्याची वेळ आल्याचे वरुणचे म्हणणे आहे. यासाठी त्याने आपले पूर्ण लक्ष ‘एबीसीडी-२’ चित्रपटावर केंद्रित केले आहे. टि्वटरवरील आपल्या संदेशात तो म्हणतो, ‘बदलापूर’ आणि दिग्दर्शक श्रीराम राघवनला मी कधीही विसरू शकणार नाही, परंतु भूतकाळात न रमता अभिनेता म्हणून प्रचंड इच्छा शक्ती एकवटून पुढची वाटचाल करण्यासाठी सक्षम होणे गरजेचे आहे. सध्या वरुण रेमो डिसुझाच्या ‘एबीसीडी-२’ या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. २०१३ साली आलेल्या ‘एबीसीडी’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे.

Story img Loader