‘बदलापूर’चे ट्रेलर युट्युबवर प्रसिद्ध झाले असून, दिग्दर्शक श्रीराम राघवनने वरुण धवनला सूडाने पेटलेल्या तरुणाच्या अवतारात समोर आणले आहे. या ट्रेलरची उत्सुकतेने वाट पाहाणाऱ्यांना नक्कीच तो आवडेल असे दिसते. ‘बदलापूर’ चित्रपटाच्या १.४० मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये थरारक सूडनाट्याची अनुभूती येते. वरुणच्या व्यक्तिमत्वात होत जाणारा बदलदेखील अनुभवता येतो. चित्रपटातील अन्य कलाकार यामी गौतम, नवाझउद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी, विनय पाठक आणि दिव्या दत्ता यांचेदेखील दर्शन होते.

वरुण धवन ‘बदलापूर’मध्ये पित्याच्या भूमिकेत

ट्रेलरमध्ये नवाज अगदी थोड्या वेळासाठीच दिसतो. कोणते ही संवाद न बोलता, केवळ आपल्या अदाकारीने नवाझ त्याची छाप ठेऊन जातो. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने आत्तापासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

Story img Loader