वरुण धवन सध्या ‘भेडिया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. आजवर त्याने साकारलेल्या चॉकलेट हिरोच्या भूमिका रुपेरी पडद्यावर प्रचंड गाजल्या. पण ‘भेडिया’मध्ये त्याचा नवा अवतारच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर पाहता प्रेक्षकांचा याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शिवाय वरुणचा चित्रपटाच्या पोस्टरवरील लूक विशेष लक्षवेधी आहे.

या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात अंगावर काटा आणणाऱ्या रॅप गाण्याने होते. घनदाट जंगल, जंगलामध्ये असणारं एक अलिशान घर, जीव वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पळत असलेली व्यक्ती, या व्यक्तीचा पाठलाग करणारा प्राणी याचा संपूर्ण थरार काही सेकंदाच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

टीझरमध्ये घनदाट जंगल आणि प्रत्येक सीन्सने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वरुणनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. चित्रपटाचा टीझर पाहून चित्रपट सुपरहिट ठरणार, या चित्रपटाची आम्ही वाट पाहत आहोत अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

आणखी वाचा – बँक बॅलन्स संपला, घर चालवण्यासाठी पैसे हवे म्हणून शरद पोंक्षेंनी सुरु केला नवा व्यवसाय, म्हणाले, “मिठाई विकतो अन्…”

वरुणसह या चित्रपटामध्ये क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अद्याप क्रितीचा या चित्रपटामधील पहिला लूक समोर आलेला नाही. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. तसेच चित्रपट २५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.

Story img Loader