दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. समांथा ही गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या चित्रपटातील तिच्या आयटम सॉंगमुळे चर्चेत होती. पण सध्या समांथा एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समांथा सध्या मुंबईत आहे. यावेळी समांथा आणि बॉलिवूड अभिनेता वरुण धवन एकत्र दिसले. या दोघांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हालर झाला आहे. समांथा आणि वरुणचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत जसे फोटोग्राफर समांथा जवळ जातात, तसा वरुण समोर येतो आणि बोलतो की “तिला घाबरवू नका, का घाबरवत आहात तिला? त्यानंतर वरुण समांथाला तिच्या गाडी पर्यंत सोडायला जातो आणि एका बॉडीगार्ड जसं संरक्षण करतो तसं तो समांथाचा संरक्षण करतो.

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

आणखी वाचा : “घाई-घाईत बेडरूममधून…”, डीप नेक ड्रेसमुळे समांथा रुथ प्रभू झाली ट्रोल

आणखी वाचा : “ती तुला भाव देत नाही मग…”, क्रितीसोबतच्या ‘या’ व्हिडीओमुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल

समांथा आणि वरुणचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले आहे, तर काही नेटकऱ्यांनी त्याची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक कमी झाले का की आता त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “त्याने ज्या प्रकारे समांथाच्या संरक्षणासाठी हात पुढे केले पण समांथाला हात लावला नाही ते मला आवडलं.” तिसरा नेटकरी म्हणाला, “चौकीदार धवन.” अशा प्रकारच्या अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan protecting samantha ruth prabhu video viral on social media dcp