बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या वरुण धवन हा तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अमर कौशिक दिग्दर्शित ‘भेडिया’ या थ्रिलर चित्रपटात वरुण धवन हा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतंच वरुणने त्याच्या आगामी चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला आहे. तसेच यावेळी वरुणने नवीन प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी वरुण धवनने त्याचे वडील डेव्हिड धवन यांच्यासह ‘द अनुपम खेर शो-कुछ भी हो सकता है’ या शो मध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी वरुणने त्याच्या आयुष्यातील अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर केल्या. यावेळी त्याने एक अशी खासगी गोष्ट सांगितली जी ऐकून त्याचे वडिलही थक्क झाले.
यावेळी वरुण म्हणाला, “फार पूर्वी मी एका मुलीसोबत रुममध्ये होतो. त्यावेळी अचानक खोलीचा दरवाजा बाहेरुन ठोठावण्यात आला. मी दरवाजा उघडला तेव्हा त्या व्यक्तीने मला सांगितले की बाहेर तुमचा भाऊ आला आहे. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि म्हणालो, अरे देवा… त्यानंतर मी बाहेर आलो आणि समोर बघताच त्याने लगेच माझ्या कानाखाली मारली. त्यानंतर आम्ही असेच चालत चालत दुसऱ्या मजल्यावर पोहोचलो, तेव्हा त्याने अचानक मला आणखी एक कानाखाली मारली. त्यानंतर मी त्याला म्हटले, कृपया तू हे सर्व आई-वडिलांना सांगू नकोस. मी त्याला ही विनवणी करतच आम्ही सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचलो. तोपर्यंत त्याने मला सहा कानाखाली लगावल्या होत्या. त्याने प्रत्येक मजल्यावर माझ्या कानाखाली मारली होती.” असे वरुणने सांगितले.
हेही वाचा : शमितावर ‘ती’ कमेंट केल्याने देवोलीनावर सलमान खान संतापला
“यानंतर मला वाटले की त्याने मला मारल्यानंतर तो आता यातलं काहीही आई-वडिलांना सांगणार नाही. पण असे काहीही झाले नाही. त्याने घरी जाऊन सर्व आई-वडिलांना सांगितले,” असा किस्सा वरुणने सांगितला.
हे सर्व ऐकल्यानंतर डेव्हिड धवन जोरजोरात हसायला लागला. यानंतर माझ्या भावाने वर जाऊन वडिलांना सांगितले की हा माझे नाव खराब करतो आहे. हा एका मुलीसोबत एकटाच खोलीत होता. त्यावेळी मी त्याला म्हणालो, की मी तुझे नाव काय खराब करतो आहे. तू माझ्यापेक्षा चार वर्षे मोठा आहेस, असे वरुणने सांगितले.