गेल्या वर्षी डिसेंबर २०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता वरुण धवनला करोनाची लागण झाली होती. नुकताच वरुण अरुणाचल प्रदेशमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मुंबईत परतला आहे. एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत करोनाशी त्याने कसा लढा दिला याबद्दल वरुणने सांगितले आहे.
वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर मलायकाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मलायकाच्या या व्हिडीओत तिने आणि तिच्या संपूर्ण योगा टीमने ब्रिथिंग एक्सरसाइज वेगवेगळ्या भाषेत समजवले आहेत. ‘या त्याच ब्रिथिंग एक्सरसाइज आहेत, ज्या मी करोना संक्रमित झालो होतो तेव्हा करायचो,’ अशा आशयाचे कॅप्शन वरुणने दिले आहे.
मलायकाला देखील सप्टेंबर २०२० मध्ये करोनाची लागण झाली होती. मलायका आता चित्रपटात दिसत नसली तरी तिच्या फिटनेस आणि योगामुळे ती नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर योगाचे व्हिडीओ शेअर करत ती अनेकांना प्रेरित करते.
वरुणला काही दिवसांपूर्वी पत्नी नताशा दलालसोबत मुंबई विमानतळावर पाहिले होते. त्यावेळी तो अरुणाचल प्रदेशवरून ‘भेडिया’ या त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मुंबईत आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केले आहे. तर चित्रपट एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.