नव्या युगाचा गोविंदा म्हणजेच वरुण धवनला चाहत्यांची पसंती मिळत आहे, असे वाटते. २३ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘मै तेरा हिरो’ चित्रपटाच्या ट्रेलरने लाखो लोकांचे लक्ष यूट्यूबवर वेधले आहे.
पाहा: वरुण धवनच्या ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटाचा ट्रेलर
या चित्रपटाच्या ट्रेलरने २० लाखांच्यावर हिट्स पार केले आहेत. वरूण धवन पहिल्यांदाच पिता डेविड धवन यांच्या चित्रपटात काम करत असून वरुणला पाहिल्यावर तुम्हाला त्याच्या वडिलांचा फेव्हरेट अभिनेता गोविंदाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. डेविड धवन यांच्या अन्य चित्रपटांप्रमाणेच बॉलिवूड चित्रपटासाठी आवश्यक असलेला मसाला यात ठासून भरलेला आहे. रोमान्सपासून कॉमेडीपर्यंत आणि खुसखुशीत संवादांपासून हाणामारीपर्यंत यात सर्व काही आहे. इलियाना डिक्रुझ आणि नर्गिस फाखरी बॉलिवूडच्या या दोन सुंदऱ्याबरोबर वरुण रोमान्स करताना दिसणार आहेत. या चित्रपटात तो एका सामान्य कुटुंबातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याची भूमिका साकारत असून, चित्रपटातील हाणामारीची दृष्ये साकारण्यासाठी त्याने खास ट्रेनिंग घेतले आहे. आलिशान सेट, खुसखुशीत संवाद आणि आनंदी वातावरण दाखविण्यात आलेला हा चित्रपट डेविड धवन यांच्या नेहमीच्याच शैलीतला आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी प्रॉडक्शन’ बॅनरखाली बनलेला हा चित्रपट ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2014 रोजी प्रकाशित
‘मै तेरा हिरो’च्या ट्रेलरला २० लाखांवर हिट्स
नव्या युगाचा गोविंदा म्हणजेच वरुण धवनला चाहत्यांची पसंती मिळत आहे, असे वाटते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-01-2014 at 12:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawans main tera hero trailer crosses two million hits on youtube