बॉलीवूड स्टार्स वरूण धवन, इलियाना डिक्रुझ आणि नरगीस फक्री यांना इंदौर येथे लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. इंदौर येथे मै तेरा हिरो चित्रपट प्रचारादरम्यान प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने त्यांच्या महागड्या गाड्या जप्त केल्या.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण अधिकारी योगेंद्र राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गाड्या हे तिघहीजण बराच वेळ वापरत असून त्यांची नोंदणी करण्यात आलेली नव्हती. दोन्ही बीएमडब्ल्यू जप्त करण्यात आल्यामुळे वरूण, इलियाना आणि नरगिस दुस-या गाड्यांमधून प्रवास करावा लागला. सात लाखांचा कर भरल्यानंतर या गाड्या कलाकारांना देण्यात येतील, असे राणा यांना सांगितले.

Story img Loader