दाक्षिणात्य अभिनेता वरुण तेज व त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री लावण्या त्रिपाठी यांनी इटलीमध्ये शाही सोहळ्यात लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यांच्या लग्नाला राम चरण, उपासना, अल्लू अर्जुन, स्नेहा रेड्डी, पवन कल्याण आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी हजेरी लावली होती. नुकतेच हैदराबादमध्ये त्यांचे रिसेप्शन झाले.

अवघ्या तीन वर्षांत मोडलं पहिलं लग्न, अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

Nizam, Razakars, and Operation Polo
Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
mla kshitij thakur
“वसईच्या सनसिटी येथे धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न”, आमदार क्षितीज ठाकूर यांचा आरोप
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
Peshwa Maratha sacking of the Sringeri math
Tipu Sultan History: पेशव्यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी लुटला होता ‘शृंगेरी मठ’; या ऐतिहासिक घटनेत किती तथ्य?
Sarangi maestro Pt Ram Narayan passes away
व्यक्तिवेध : पं. रामनारायण

वरुण व लावण्या यांनी इटलीमधील टस्कनी येथील बोर्गो सॅन फेलिस रिसॉर्टमध्ये १ नोव्हेंबर रोजी लग्न केलं. या जोडप्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यानंतर नेटकरी त्यांच्या लग्नाचं लोकेशन आणि शाही थाट पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. अशातच या दोघांच्या लग्नासाठी झालेल्या खर्चाबद्दल माहिती समोर आली आहे.

वरुण आणि लावण्या यांनी लग्नाचा दिवस खास व संस्मरणीय बनवण्यासाठी बराच पैसा खर्च केला आहे. आलिशान लग्न ठिकाण, आकर्षक सजावट आणि दोघांचे अतिशय सुंदर पोषाख यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. या दोघांचे लग्न खूपच भव्य झाले. ‘डीएनए’ने ‘सियासत डेली’च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याने त्यांच्या लग्नात १० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला.

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी या दोघांनी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले कपडे लग्नात परिधान केले होते. वृत्तानुसार, लावण्याने लग्नात नेसलेल्या साडीची किंमत १० लाख रुपये आहे आणि वरुण तेजच्या क्रीम-गोल्ड शेरवानीची किंमत देखील लाखोत आहे. या जोडप्याच्या अंगठीची किंमत प्रत्येकी २५ लाख रुपये आहे, असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, लावण्या व वरुणचे रिसेप्शन हैदराबादमध्ये पार पडले. या सोहळ्याला अभिनय व खेळ जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.