‘मी आजवर जे काही बरं काम केलं त्याला प्रोत्साहन दिलं, कौतुक तुम्ही माय बाप रसिकांनी. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढवला. मी खरच तुम्हा संर्वांची खूप ऋणी आहे. काहीही कळत नसताना कला क्षेत्रात आल्यावर मिळालेला सगळ्याचा पाठींबा खूप आधार देणारा होता. आज वर अनेक पुरस्कार मिळाले पण संस्कृती कलादर्पण कलागौरव पुरस्कार २०१५ घेताना विशेष आनद होतोय. याच वर्षी माझ्या मराठी चित्रपट कारकिर्दीला ५० वर्ष पूर्ण झाली. जेव्हा एखाद्या कालाकाराला पुरस्कार मिळतो तो त्याच्या एकट्याचा कधीच नसतो. त्याच्यामागे अनेकांचे आशीर्वाद, सहकार्य आणि प्रेम असत. माझ्या बाबतीही तसच आहे. माझी आई, भाऊ अनिल काळे आणि पती कै.माधव पांडुरंग नाईक याच्या लाभलेल्या साथीने मी एक संपन्न कलाकर होऊ शकले, अशी प्रांजळ कबुली आशा काळे यांनी दिली. त्याच बरोबर माझ्या ५० वर्षांच्या कारकीर्दीचा जल्लोष संस्कृती कलादर्पण सोबत आणि माझ्या चाहत्यांसोबत करतेय याचं मला खूप समाधान असल्याचाही आशाताई म्हणाल्या. अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१५ हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळ्यात संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्ष अर्चना नेवरेकर आणि संस्थेचे संथापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते संस्कृती कलादर्पण कलागौरव हा पुरस्कार ज्येष्ठ कलावंत आशा काळे यांना प्रदान करण्यात आला. मोठ्या धडाक्यात संपन्न झालेल्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत तंत्रज्ञ, कलावत मंडळी उपस्थित होती.
कला क्षेत्रात मिळालेला पाठींबा खूप आधार देणारा- आशा काळे
'मी आजवर जे काही बरं काम केलं त्याला प्रोत्साहन दिलं, कौतुक तुम्ही माय बाप रसिकांनी.
आणखी वाचा
First published on: 28-04-2015 at 01:38 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veateran actress asha kale got kalagaurav award