रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम रचत आहे. या चित्रपटाची जादू प्रेक्षकांवर कायम आहे. या चित्रपटाने बुधवार १८ जानेवारीपर्यंत तब्बल ५० कोटींची कमाई केली आहे. वेड चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल रितेश देशमुख आणि जिनिलीयाने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश देशमुखने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने काही फोटो पोस्ट केले आहेत. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०.१८ कोटी रुपयांची कमाई केली आणि दुसऱ्या आठवड्यात २०.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकूण ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्या निमित्ताने त्याने चाहत्यांचे आभार मानले आहे.
आणखी वाचा : स्वप्निल जोशीने ‘वेड’साठी केलेल्या ट्वीटवर जिनिलियाची मराठीत कमेंट, म्हणाली “तुमच्या…”

“शब्द अपुरे पडत आहेत!!! वेड चित्रपटाला मोठ्या मनाने आपण स्वीकारले आणि भरभरून प्रेम दिल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे कोटी कोटी आभार!” असे रितेश देशमुखने म्हटले आहे.

रितेश देशमुखचा वेड हा मराठी चित्रपट एकाच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ‘सैराट’च्या नावे असलेला विक्रम मोडला आहे. तर रितेश देशमुखचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट हा ‘लय भारी’चा रेकॉर्डही ‘वेड’ने मोडला. आता या चित्रपटाने सर्वात जास्त कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved box office collection riteish deshmukh genelia marathi film thanks to instagram post nrp