गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचा शुभारंभ सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती दर्शविली. यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच्या फर्स्ट लूकची झलकही काल प्रदर्शित करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाबद्दल आणि भूमिकेबद्दल अक्षय कुमारला अनेक प्रश्न यावेळी विचारण्यात आले. तसेच त्याला त्याचा हा पहिला लूक कसा वाटला याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने फार सविस्तरपणे मत मांडले.
आणखी वाचा : अक्षय कुमार साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका; CM शिंदे, राज ठाकरेंच्या उपस्थित चित्रपटाची घोषणा

“मला ही भूमिका राज ठाकरेंमुळे मिळाली. तू ही भूमिका करायला हवी, असं मला राज ठाकरे म्हणाले. छत्रपती महाराजांची भूमिका साकारणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. सगळी शक्ती मी यासाठी खर्च करेन. महेश मांजरेकर आणि मी पहिल्यांदा काम करणार आहे. हा एक चांगला अनुभव असेल, याची मला खात्री आहे.

तुम्ही दाखवलेला हा लूक अजून फायनल झालेला नाही. हा फक्त फर्स्ट लूक आहे. मी राज ठाकरेंना याबद्दल विचारत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे नाक फार धारदार होते. ती फक्त एक गोष्ट माझ्यात साम्य आहे. यावर मला खूप काम करायचं”, असे अक्षय कुमार म्हणाला.

आणखी वाचा : “कोणीतरी आपल्याला जा म्हणण्यापेक्षा…” पॅडी कांबळेने सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्यामागचे कारण

‘तुला ही भूमिका साकारायला मिळते तर काय सांगशील?, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, “ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे. अशा रोल साकारायला मिळणं हे खरंच खूप मोठं भाग्य आहे. हा रोल म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरल्यासारखे झालं आहे.

‘वेडात मराठी वीर दौडले सात’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे प्रतापराव गुजर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर बिग बॉस फेम उत्कर्ष शिंदे, जय दुधाणे, विशाल निकम आणि तुझ्यात जीव रंगला अभिनेता हार्दिक जोशीही चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vedat marathe veer daudale saat comment akshay kumar to play chhatrapati shivaji maharaj nrp