मराठी सिनेमांचा झेंडा सातासमूद्रापार पोहोचल्याने जगाच्या पाठीवर मराठी सिनेमाची आणि कलाकारांची मान नक्कीच उंचावली आहे. त्याचप्रमाणे मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकरदेखील जगभरातील सिनेमात काम करत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री वीणा जामकर हिचं. मराठीतील विद्या बालन म्हणून ओळखली जाणारी वीणा दुर्गा या लघूपटात एका बंगाली स्त्रीची भूमिका करतेय. विवेक कजारिया दिग्दर्शित हा लघूपट कोरियात   झालेल्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला आहे. वीणाचा अभिनय आणि तिच्या दिसण्यातील वैविध्य अतिशय अप्रतिम असल्याने दुर्गा मध्ये साकारलेली भूमिका तितकीच महत्वपूर्ण आणि बोलकी असणार यात शंका नाही. या लघुपटाचा विषय मुलीचा जन्म याच्याशी संबंधित आहे. एका घरात मुलीचा जन्म होणं किती महत्वाचं आहे यावर आधारित हा लघुपट आहे. कथेची पार्श्वभूमी बंगाली संस्कृतीचं दर्शन घडवून आणणारी आहे त्यामुळे हा लघूपट करताना मला खूप मजा आली. विवेक स्वतः पहिल्यांदा दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याने आमच्या दोघांचा अनुभव खूप चांगला होता. कोणत्याही प्रकारचा बढेजावपणाचा आविर्भाव नसल्याचे वीणाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा