Veena Jamkar: महाराष्ट्रात निवडणूक नुकतीच पार पडली आहे. अनेक लोक सोशल मीडियावरुन व्यक्त होताना दिसत आहेत. मराठा फॅक्टर हा देखील चर्चिला गेला. दरम्यान मराठी अभिनेत्री वीणा जामकरने एक पोस्ट केली आहे जी पोस्ट चर्चेत आली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला व्होट जिहाद झाला आता धर्मयुद्ध करायची आवश्यकता आहे असं भाजपाकडून सांगण्यात आलं. याच दरम्यान मराठी अभिनेत्री वीणा जामकरची ( Veena Jamkar ) पोस्ट चर्चेत आली आहे.
वीणा जामकरची पोस्ट काय?
वीणा जामकरने ( Veena Jamkar ) तिच्या फेसबुकवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. वीणा तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. वीणाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तिचा मुद्दा पटला असल्याचंही म्हटलंय. वीणाने ही पोस्ट करत म्हटलं की, “लग्न करताना जर धर्म बदलण्याची सोय आहे, तर जात बदलण्याची पण असूच शकते ना..? एक विचार…”
वीणाच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
वीणाच्या ( Veena Jamkar ) या पोस्टवर विविध विचारांच्या कमेंट्स आल्याचं पाहायला मिळतंय. एकाने कमेंट करत यावर म्हटलं की, आरक्षणासाठी लोक मागासवर्गीय सोबत नाते जोडायला तयार होतील. विचार सुधारतील का नाही हे माहीत नाही. यावर वीणानेही उत्तर दिलं आहे. तिने म्हटलं की, लोक प्रेमाने मागासवर्गीयाबरोबर नाते जोडतात… हे ही सत्य आहे. माझी आई! तसेच एकाने म्हटलं की, कधीच जात नाही ती जात आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, विचार चांगला आहे.
हे पण वाचा- ‘द सेकंड सेक्स’ म्हणजे स्त्रीवादाचं बायबल- वीणा जामकर
वीणा जामकर ही नावाजलेली अभिनेत्री
वीणा जामकर ( Veena Jamkar ) हिने रंगभूमीवरुन तिच्या अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. नाटक, एकांकिका, दीर्घांकिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. गाभ्रीचा पाऊस,जन्म,पलतडचो मुनिस (कोकणी),लालबाग परळ,वळू,विहीर,रमाई या सिनेमातून वीणा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. एक रिकामी बाजू,खेळ मांडियेला,चार दिवस प्रेमाचे,जंगल में मंगल या नाटकांमधून वीणे महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे नुकतीच ती सोनी मराठीवरील छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्न या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत होती.
वीणा जामकरच्या ( Veena Jamkar ) या पोस्टची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. कलाकार जेव्हा व्यक्त होतात तेव्हा त्याची चर्चा होत असतेच. तशीच ही चर्चा आहे. वीणा जामकरने केलेली पोस्ट खरोखरच विचार करण्यासारखी आहे.