स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ ही हिंदी वेब सीरिज लवकरच छोट्या पडद्यावर येणार आहे. . या वेब सीरिजचे पोस्टर आणि दोन टीझर प्रदर्शित करण्यात आले असून यामध्ये मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले वीर सावरकरांची भूमिका साकारणार असून याबाबत त्याने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : IPL 2023 चे विजेतेपद कोणता संघ जिंकेल? उर्वशी रौतेला म्हणाली…

वीर सावरकरांची भूमिका साकारताना आलेल्या अनुभवाविषयी सौरभ म्हणाला, “कोणत्याही कलाकाराला ऐतिहासिक भूमिका साकारायला मिळणे हे त्याचे भाग्य असते. आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका करण्याची मला संधी मिळाली आहे. वीर सावरकरांचे साहित्य वाचून, त्यांचा अभ्यास करून चांगल्या पद्धतीने ही भूमिका साकारण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘जानकी’च्या भूमिकेबद्दल अभिनेत्री क्रिती सेनॉन म्हणाली, “कारकिर्दीत सहसा…”

‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या हिंदी वेब सीरिजचे पोस्टर सौरभने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये सौरभ लिहितो की, “मी विनायक दामोदर सावरकर! तात्याराव सावरकर… हिंदुहृदयसम्राट सावरकर… स्वातंत्र्यवीर सावरकर… होय आणि माझ्या टीकाकारांच्या मते देशद्रोही सावरकर… देशद्रोही आणि सावरकर? मी माझ्याबद्दल फार बोललो नाही…काळ खूप वेगाने पुढे सरकत आहे… इतिहास नाहीसा होतो मग विनायक दामोदरसारख्या सामान्य माणसाची गोष्ट कोण लक्षात ठेवील? पण कथा कोणा एका विशिष्ट व्यक्तीची नाही.. ती व्यक्ती घडवणाऱ्या सामान्य-असामान्य लोकांची आहे! तो ज्या मातीत जन्मला, जिथे तो वाढला, त्याचा इतिहास म्हणजे त्याची कहाणी. माझी गोष्ट सांगायच्या आधी मनात विचारांचे वादळ उठले… माझ्या आयुष्याबद्दल कसं सांगू? मी काय सांगावं ? आणि आणखी…’वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’…लवकरच”

हेही वाचा : “अधुरा था मैं, अब पुरा हुआ…” कार्तिक-कियाराच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष, ‘सत्यप्रेम की कथा’मधील पहिले गाणे रिलीज

‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या हिंदी वेब सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन योगेश सोमण करणार असून याची निर्मिती डॉ. अनिरबन सरकार करणार आहेत. ही सीरिज तीन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. या वेब सीरिजच्या माध्यमातून वीर सावरकरांचे विचार, शौर्य, बलिदान आजच्या नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न असेल, असे निर्मात्यांनी सांगितले आहे. ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ ही वेब सीरिज पुढच्या वर्षी २६ फेब्रुवारीला वीर सावरकरांच्या पुण्यतिथीला प्रदर्शित केली जाणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veer savarkar secret files new hindi webseries announcement this marathi actor will play main role sva 00