दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या बहुचर्चित ‘वीरप्पन’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कुख्यात चंदनतस्कर असलेल्या वीरप्पनचा क्रूर चेहरा आणि पोलीसांना जेरीस आणणारी त्याची कृत्यांची झलक पहायला मिळते. वीरप्पनचे जंगलातील जीवन, हस्तिदंतांची तस्करी, शत्रूंना क्रूरपणे मारण्याची त्याची वृत्ती असे अनेक घटक या ट्रेलरमध्ये पहायला मिळतात. एकुणच त्याकाळी वीरप्पनचा जंगलात असणारा दबदबा ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसून येतो. या चित्रपटात संदीप भारद्वाज वीरप्पनची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. हा चित्रपट प्रामुख्याने वीरप्पनच्या जीवनावर नाही तर त्याला मारणाऱ्या व्यक्तीवर आधारित आहे.
एकेकाळी वीरप्पनने खूप मोठी दहशत निर्माण केली होती. कर्नाटक आणि तामिळनाडू शासनाला त्याने सळो की पळो करून सोडले होते. अखेर २००४ मध्ये पोलीस चकमकीत तो मारला गेला होता. तामिळनाडू, केरळ व कर्नाटक शासनाने त्याला पकडण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले होते, मात्र एका व्यक्तीकडून तो मारला गेला. ‘वीरप्पन’ चित्रपटात प्रामुख्याने या घटनेला महत्त्व देण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा