एकेकाळी कर्नाटकमध्ये दहशत निर्माण केलेला कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन हा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचे अपहरण करणार होता, अशी माहिती चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याने दिली आहे. वीरप्पनच्या आयुष्यावरील चित्रपट तयार करताना संशोधन करतेवेळी आपल्याला ही माहिती मिळाल्याचे रामगोपाल वर्मा यांनी म्हटले आहे.

चित्रपटासाठी रामगोपाल यांनी वीरप्पनच्या आयुष्यातील विविध पैलू जाणून घेण्यासाठी अनेकांशी बातचीत केली होती. वीरप्पनचे एकेकाळचे साथीदार आणि सरकार यांच्यातील चर्चेतील मध्यस्थ तसेच वीरप्पनविरोधातील मोहीमेतील काही अधिकाऱयांशी रामगोपाल यांनी चर्चा केली होती. या चर्चेतूनच रजनीकांत यांचे अपहरण करण्याचा वीरप्पनचा इरादा होता, अशी माहिती समोर आल्याचे रामगोपाल वर्मा यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ‘वीरप्पन’ हा रामगोपाल यांचा चित्रपट येत्या २७ मे रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

पाहा: चंदनतस्कराचा क्रूर चेहरा दाखविणारा ‘वीरप्पन’चा ट्रेलर

Story img Loader