अमोल अरविंद भावे दिग्दर्शित धमाकेदार मराठी ‘वीरात वीर मराठा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. नवी स्टारकास्ट घेऊन तयार करण्यात आलेल्या या सिनेमात प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचीही भूमिका असणार आहे. येत्या ६ नोव्हेंबरला हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या धमाकेदार सिनेमाचं म्युझिक लॉन्च नुकतंच दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष अश्फाक खोपेकर यांच्या हस्ते करण्यात आलं.
या म्युझिक लॉन्चला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कलाकार तेज सप्रु, प्रिती सप्रु, अभिनेते मुकेश ऋषी आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर हे उपस्थित होते. आर्यजीत, तन्वी किशोर, विक्टर राघव, रीमा लागू, शशांक दरने, दया, स्वाहता बेहके, प्रतिक यांच्या मुख्य भूमिका असून संजय विचारे, प्रदीप देसाई, रजत दीप, विक्की, मनीष त्यागी, बिरबल, सन्नी पुंडीर, अरवेश राघव, मुन्ना, प्रवीण, विकास फडनीस, नरेंद्र जैन, संदीप जुआटकर, राजेश गुप्ता यांच्याही भूमिका आहेत. तर फराह शेख यांचं एक आयटम साँगही आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा