श्री बाळ कोल्हटकर यांनी गेली ४० वर्षे मराठी रंगभूमीवर अधिराज्य गाजवलं. राम गणेश गडकऱ्यांच्या भाषेचे संस्कार त्यांच्या संवादांवर ठायी ठायी जाणवतात. कुटुंबातील नातेसंबंधाचे रेशमी बंध हळुवार उलगडणाऱ्या या लेखकाची नाटक आणि त्यातल्या उत्तम मराठी भाषेचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात झी मराठी नक्षत्र सादर करीत आहे , एक सदाबहार कौटुंबिक नाटक ‘वेगळं व्हायचंय मला ‘ . निवेदिता सराफ , जयंत सावरकर , दिपक देऊलकर ,लोकेश गुप्ते ,मिलिंद फाटक,शर्वरी पाटणकर अशा नटसंचात सजलेलं हे नाटक मराठी मनाचा ठाव घेईल यात शंकाच नाही.
कथासार : एकत्र कुटुंब पद्धतीत सुखात नांदणार एक कुटुंब. पण  याच कुटुंबाला पैसा ,महत्वाकांक्षा यांचं ग्रहण लागतं आणि नातेसंबाधात खेचली जाते एक लक्ष्मण रेषा . हि रेषा पुसून हे कुटुंब पुन्हा एकत्र येईल का ?
बाळ कोल्हटकर लिखित एक सदाबहार कौटुंबिक नाट्यकृती  ‘वेगळं व्हायचंय मला ‘ झी मराठी वर या रविवारी १३ जुलै रोजी, दुपारी २.०० वा . दाखविण्यात येणार आहे.

Story img Loader