जगभरातील ८६ देशांतील सुंदरींना मागे टाकत व्हेनेझुएलाच्या गॅब्रिएला इस्लेर हिने यंदाचा मिस युनिव्हर्सचा किताब पटाविला आहे.
२५ वर्षीय इस्लेर व्हेनेझुएलात फ्लॅमेंको डान्सर म्हणून ओळखली जाते. मागील वर्षीच्या मिस युनिव्हर्स असलेल्या अमेरिकेच्या ओलाव्हियो कल्पो हिच्या हस्ते इस्लेरला हा किताब देण्यात आला.
स्पेनची पेट्रासिया युरेना ही दुसऱया स्थानावर राहिली. तर, मिस इक्वेडोर कॉस्टांज बेजला तिसरे स्थान मिळाले. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत असलेली मानसी मोघे हिला पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये स्थान मिळविण्यात यश आले होते. पण, अंतिम पाच स्पर्धकांमध्ये तिला स्थान मिळू शकले नाही.

Story img Loader