बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या यशाची जी नवनवी शिखरे पादाक्रांत करते आहे ते पाहून तिच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, अशी भावना अभिनेता शाहिद कपूर याने व्यक्त केलीये. फक्त मलाच नाही तर संपूर्ण बॉलीवूडला तिच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे.
झी सिने अवॉर्ड्स २०१६ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शाहिदने प्रियांकाचे तोंडभरून कौतुक केले. झी सिने अवॉर्ड्सचे सूत्रसंचालन यावेळी शाहिदच करणार आहे. तो म्हणाला, आपल्या कामाने प्रियांका भारताचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीची कलाकार होण्याची ताकद प्रियांकामध्ये पहिल्यापासूनच होती. तिने आता ते सिद्धही करून दाखवलंय. तिच्या पुढील कारकीर्दीला मी शुभेच्छा देतो.
यंदाच्यावर्षी ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या कलाकारांमध्ये प्रियांकाचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ती अमेरिकेतील टीव्ही शो ‘क्वांटिको’च्या दुसऱ्या सत्रासाठी सध्या शुटिंग करते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा