भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येणारा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना चित्रपट क्षेत्रात आणि अभिनयातील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. आपल्या दमदार अभिनयाने ६० ते ७० च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. त्या ७९ वर्षांच्या आहेत. ६०-७० च्या दशकात त्या त्यांच्या मानधनामुळेही चर्चेत असायच्या. त्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती.
आणखी वाचा : समीर चौगुले की पॅडी कांबळे आवडता सहकलाकार कोण? विशाखा सुभेदार म्हणाली….

‘मेरा गाव मेरा देश’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मजिल’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून आशा पारेख यांना ओळखले जाते. एकेकाळी त्यांनी त्यांच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले होते. त्यांनी अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती. १९५९ पासून ते १९७३ च्या काळात त्यांनी बॉलिवूडवर जादूच केली होती. त्यावेळी आशा पारेख यांच्या सौंदर्याचे लाखो चाहते होते.

आशा पारेख यांचा अल्पपरिचय

आशा पारेख यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी झाला. १९५९ ते १९७३ या काळात बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून तिला ओळखले जाते. आशा पारेख यांना बालपणापासून नृत्याची आवड होती. त्यांची आई सुधा पारेख यांनी आशा यांना नृत्य शिकण्यासाठी शिकवणीही लावली होती. एकदा एका कार्यक्रमात दिग्दर्शक बिमल रॉय यांनी आशा यांचे नृत्य पाहिले. त्यावेळी आशा यांचे वय दहा वर्ष होते. आशा यांचे नृत्य पाहून दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना १९५७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मां’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी दिली. त्यानंतर त्यांनी ‘बाप बेटी’ या चित्रपटासह ९५ हून अधिक चित्रपटात काम केले. राजेश खन्ना, मनोज कुमार , सुनील दत्त आणि धर्मेंद्र यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत आशा पारेख यांनी स्क्रिन शेअर केली.

आणखी वाचा : “माझ्याशी वैर घ्यायचं नसतं वाघोबा…” सुमीत राघवन आणि अमेय वाघमध्ये वादाची ठिणगी; जाणून घ्या प्रकरण काय?

आशा पारेख आणि राजेश खन्ना यांची जोडी पडद्यावर सुपरहिट म्हणून ओळखली जायची. त्यांनी एकत्र ‘दिल दे के देखो’, ‘जब प्यार किसी से होता है’, ‘तीसरी मंझील’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘कटी पतंग’ या चित्रपटासाठी आशा पारेख यांना सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्कार‎ मिळाला होता. तसेच १९९२ मध्ये त्यांच्या अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने आशा पारेख यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवही केला होता.