विनोदी भूमिका साकारत आपल्या लाजवाब टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखले जाते. मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी यंदा वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यासोबत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी ही नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रिनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात फार गाजला होता. नुकतंच एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांची आणि त्यांचे सासरे यांची ओळख कशी झाली होती? याबद्दल खुलासा केला आहे.
अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता यांच्या वडिलांनी आपल्या मुलीची ओळख अशोक सराफ यांच्यासोबत करुन दिली होती, याबद्दल अनेकांना ठाऊक आहे. मात्र आता अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचे वडील गजन जोशी यांची ओळख कशी झाली होती, याबद्दल त्यांनी स्वत:च एक किस्सा सांगितला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार कलाकाराची जोडी म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता जोशी सराफ यांना ओळखले जाते. निवेदिता जोशी सराफ यांचे वडील गजन जोशी आणि आई विमल जोशी हे दोघेही त्याकाळी सिनेसृष्टीत सक्रीय होते. कलाकार म्हणून त्यांचा प्रचंड नावलौकिक होता. गजन जोशी यांनी एकेकाळी मराठी चित्रपटातून प्रमुख भूमिका तसेच सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. गजन जोशी यांनी सत्तरच्या दशकातील दैवाचा खेळ, सौभाग्य कांक्षीनी, आधार अशा चित्रपटातून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
माझ्या रे प्रीती फुला हे गाणं गजन जोशी यांच्यावर चित्रीत झालं आहे. आजही हे गाणं प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या गाण्याचे चित्रीकरण पुण्यात झालं आहे. पुण्यातील सारसबाग, पर्वती यासारख्या ठिकाणी हे चित्रीकरण झाले होते. याच गाण्याद्वारे गजन जोशी आणि अशोक सराफ यांची एक ओळख झाली. त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली होती. एकमेकांना एकेरी नावाने हाक मारणे, एकमेकांच्या घरी येणे जाणे असल्याने त्यांचे मैत्रीचे संबंध अधिक जवळ येत गेले. मात्र आपला मित्रच कधी आपला सासरा होईल याची कल्पनाही मी कधीही केली नव्हती, असे अशोक सराफ यांनी सांगितले.
दरम्यान अशोक सराफ आणि निवेदिता यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. मात्र त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही. अशोक आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले. त्यानंतर अशोक सराफ यांना त्यांनी प्रपोज देखील केलं. त्यानंतर त्या दोघांनी मंगेशी मंदिरात जाऊन साधेपणाने लग्नही केले. मात्र आपला मित्रच आपला सासरा होईल याची कल्पना त्यावेळी अशोक सराफ यांनी केलेली नव्हती.