नाटय़सृष्टीत मानाचा समजल्या जाणाऱ्या झी नाटय़गौरव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना या वर्षी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. गेली अनेक दशके कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटवणाऱ्या बाळ कर्वे यांनी विजया मेहता आणि विजया जोगळेकर-धुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नाटय़प्रवासाची सुरुवात केली. लालन सारंग यांच्याबरोबर ‘रथचक्र’, ‘तांदूळ निवडता निवडता’, भक्ती बर्वेबरोबर ‘मनोमनी’, ‘आई रिटायर होते’, डॉ. गिरीश ओकांबरोबर ‘कुसूम मनोहर लेले’ अशी नाटके केली. रंगभूमीवरचा त्यांचा हा आजवरचा प्रवास अविस्मरणीय ठरला. भारतीय टीव्ही मालिकांची नांदी देणारी चिं. वि. जोशी यांच्या ‘चिमणराव’ या मालिकेत त्यांनी गुंडय़ाभाऊंची भूमिका छोटय़ा पडद्यावर साकारली होती. हाती विनोदाचा सोटा घेऊ न गुंडय़ाभाऊ ने रसिकांच्या मनावर कब्जा मिळवला. मिळालेल्या संधीचे सोने कसे करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी साकारलेला गुंडय़ाभाऊ. खरंतर या भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे नाव विचारात होते, पण काही कारणाने हे घडले नाही आणि ही भूमिका बाळ कर्वे यांना मिळाली. त्यांनी ती भूमिका अजरामर केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा