अभिनेता मनोज कुमार यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले दोन दिवस त्यांच्यावर अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना काही दिवसांमध्ये घरी पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशभक्तीच्या चित्रपटांमध्ये अभिनय आणि त्यांचे दिग्दर्शन करण्यासाठी मनोज कुमार प्रसिद्ध आहेत. १९९२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

Story img Loader