दिग्गज अभिनेता नसीरुद्दीन शाह हे वयाच्या ७१व्या वर्षी देखील अनेक उत्तमोत्तम भूमिका सादर करत दिसतात. या वयातही ते व्यावसायिक आघाडीवर सक्रिय आहेत. परंतु, नेहमी फिट दिसणारे नसीरुद्दीन शाह सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत. त्यांनी स्वतः या आजाराबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की ते ‘ओनोमेटोमॅनिया’ नावाच्या वैद्यकीय समस्येने ग्रस्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधताना नसीरुद्दीन म्हणाले- ‘मला ओनोमेटोमॅनिया नावाच्या आजाराने ग्रासले आहे. मी विनोद करत नाही. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. तुम्ही ते डिक्शनरीमध्ये तपासू शकता.” नसीरुद्दीन म्हणाले की, हा आजार त्यांना शांततेत जगू देत नाही. पुढे त्यांनी या आजाराबाबत अधिक माहितीही दिली.

“एक स्वप्न आहे, जे माझ्या मनात…” ६७व्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी व्यक्त केली ‘ती’ इच्छा

ते म्हणतात- ‘ओनोमॅटोमॅनिया हा असा आजार आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतेही कारण नसताना एखादा शब्द, वाक्प्रचार, वाक्य, कविता किंवा भाषण पुन्हा पुन्हा सांगत राहता. माझ्यासोबत हे प्रत्येक क्षणी घडते, त्यामुळे मी कधीही शांततेत जगू शकत नाही. मी झोपेत असतानाही मला आवडणारे काही उतारे बडबडत राहतो.’

यावेळी त्यांनी त्यांच्या आणि पत्नी रत्ना पाठक यांच्या पुस्तकांच्या आवडीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की दोघेही एकमेकांना अनेक पुस्तकांबद्दल सांगतात पण ते क्वचितच ती पुस्तके निवडतात. पण ‘टिन टिन कॉमिक’ हे दोघांचेही आवडते आहे. नसीरुद्दीन यांनी हेही सांगितले की त्यांनीच रत्ना पाठक यांना क्रिकेटची ओळख करून दिली.

नसीरुद्दीन शाह यांनी नुकतंच ‘गहराइयां’ या चित्रपटात दीपिकाच्या वडिलांची भूमिका साकारली. अगदी लहान पात्रामधूनही त्यांनी स्वतःची छाप सोडली. याशिवाय ते कौन बनेगा शिखरवती या वेबसीरिजमध्येही दिसले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor naseeruddin shah suffers from a onomatomania pvp