बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा आज ६९ वा वाढदिवस. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लव्ह स्टोरीपासून ते लग्नापर्यंतच्या साधारणपणे साऱ्याच गोष्टी त्यांच्या चाहत्यांना माहिती आहेत. पण संजीव कुमार आणि जितेंद्र यांनाही हेमा मालिनीसोबत लग्न करायचे होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजीव यांना हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते म्हणून त्यांनी जितेंद्र यांची मदत घ्यायचे ठरवले. संजय यांनी जितेंद्रला त्यांच्या मनातील गोष्ट हेमापर्यंत पोहोचवायला सांगितले. पण तेव्हा हेमा यांनी संजीव यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला. असे म्हटले जाते की, हेमा यांनी संजीव यांना लग्नासाठी नकार दिला असला तरी त्यांना जितेंद्र आवडू लागले होते. जितेंद्र आणि हेमा यांनी ‘दुल्हन’ सिनेमाच्या चित्रीकरणावेळी एकमेकांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली. दोघांच्या घरातल्यांनीही लग्नासाठी परवानगी दिली होती. जितेंद्र यांना हेमाशी लग्न करण्याची इच्छा तर होती पण तेव्हा ते शोभा यांना डेट करत होते.

शोभा आणि जितेंद्र हे लहानपणीपासूनचे मित्र होते. शोभा यांना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी हेमा यांना जितेंद्रंना समजावयाला सांगितले. पण यादरम्यान हेमा आणि जितेंद्र यांचे कुटुंबीय एकमेकांना भेटले. एकीकडे दोन कुटुंब एकमेकांना भेटत असताना हेमा यांना धर्मेंद्र यांचा फोन आला आणि त्यांनी हेमा मालिनीसाठीचे आपले प्रेम व्यक्त केले. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी धर्मेंद्र यांनी हेमा यांना एकदा भेटायला सांगितले.

असे म्हटले जाते की, धर्मेंद्र यांची पहिली पत्नी त्यांना घटस्फोट देण्यास तयार नव्हती म्हणून धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला. हेमा यांचे वडील व्ही. एस रामानुजम चक्रवर्ती यांचा या लग्नाला विरोध होता. धर्मेंद्र आणि प्रकाश यांना आधीच चार मुले होती. म्हणून रामानुजम यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता.

वडीलांच्या निधनानंतरच धर्मेंद्र आणि हेमा यांचे लग्न झाले. या लग्नाला हेमा यांच्या आईचाही विरोध होता पण तरीही त्यांनी लग्न केले. हेमा यांच्या मते, धर्मेंद्र यांच्याकडे आकर्षित होण्याचे मुख्य कारण त्यांचा स्वभाव होता. धर्मेंद्र हे त्यांच्या आईसारखेत शांत आणि कणखर आहेत. हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि आहना या दोन मुली असून दोघींचीही लग्न झाली आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor sanjeev kumar and jeetendra want to get married to hema malini through back story