अभिनेता मनोज कुमार यांच्यावर मुंबई उपनगरातील एका रुग्णालयात आज (बुधवारी) शस्त्रक्रिया करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी मनोज कुमार यांना अंधेरी येथील कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यांच्यावर मुत्राशयाशीसंबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून, मनोज कुमार यांची प्रकृती चांगली असल्याचे रूग्णालयातील डॉ. राम नरान यांनी सांगितले.
मनोज कुमार देशभक्तीपर चित्रपटांतील अभिनयासाठी आणि दिग्दर्शनासाठी प्रसिद्ध आहेत. भारत कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले मनोज कुमार हरियाली और रास्ता, वो कौन थी, हिमालय की गोद में, दो बदन, उपकार, पत्थर के सनम, नील कमल, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान आणि क्रांती अशा अनेक चित्रटांसाठी ओळखले जातात. १९९२ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आणखी वाचा