‘रंगायन’ आणि ‘आविष्कार’ या प्रायोगिक-समांतर नाटय़चळवळीचे खंदे धुरिण आणि ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे पुत्र धनंजय यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते. गेल्या बुधवारी त्यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना नानावटी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टीही करण्यात आली होती. परंतु काल रात्री झोपेतच पुन्हा हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. पेशाने इंजिनीअर असलेल्या धनंजय यांचे वडिलांच्या नाटय़-चळवळीतील कार्यात सक्रीय सहकार्य होते.
अरुण काकडे बेळगावमध्ये झालेल्या ९५ व्या अ. भा. मराठी नाटय़संमेलनात मावळते संमेलनाध्यक्ष या नात्याने यंदाच्या संमेलनाध्यक्ष फैय्याज शेख यांना सूत्रे सुपूर्द करण्याकरिता गेले होते. मुलाच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे ते रविवारीच तिथून मुंबईत परतले होते.

Story img Loader