ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचे पूत्र व संगीतकार नंदू भेंडे यांचे शुक्रवारी दुपारी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. १९७० च्या दशकात भावगीतांच्या काळात नंदू भेंडेंनी संगीत रसिकांना रॉक गाण्यांची ओळख करुन दिली. मराठी रॉक गाण्यांमध्ये त्यांनी अतुलनीय योगदान दिले होते. सॅवेज एन्काउंटर, द ब्रीफ एन्काउंटर, वेलवेट फॉग या रॉक बँडमध्ये त्यांचा समावेश होता. १९८० च्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘डिस्कोडान्सर’ या चित्रपटासाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. आर.डी.बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहिरी या संगीतकारांसोबत त्यांनी काम केले होते. तसेच ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकातील अंकुशच्या भूमिकेतून नंदू भेडेंनी रसिकांवर आपली छाप पाडली होती. नंदू भेंडे यांचे अनेक अल्बमधील गाणी आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. टेलिव्हिजनवरील ‘चमत्कार’, ‘चंद्रकांता’, ‘जिना इसी का नाम है’,’ दायरे’ यासारख्या काही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं होतं.
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे व आशा भेंडे यांचे ते चिरंजीव होते. भेंडे याच्या जाण्याने संगीत क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले असल्याने चित्रपटसृष्टीत दुख: व्यक्त होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा