बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे सुपूत्र आनंद भोसले यांना दुबईतील रुग्णालयातील दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी आनंद अचानक जमिनीवर पडले आणि त्यानंतर त्यांना काही जखमा झाल्या होत्या. तर मिळालेल्या माहितीनुसार आनंद हे बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद यांची प्रकृती सध्या चिंताजनक नसल्याने त्यांना जनरल वार्डमध्ये हलविण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा आशा भोसले याही दुबईत होत्या आणि त्यांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व अचानक घडले. मंगेशकर आणि भोसले यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आनंद यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आजही जवळपास दररोज दुबईला फोन करत आहे.

आणखी वाचा : लग्न आलिया रणबीरचं पण चर्चा तैमूरच्या Attitude ची, पाहा Viral Video

आणखी वाचा : रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे म्हणाले, “Jealous…”

आशा यांना एकूण तीन मुलं होती. परंतु, त्यांचा मोठा मुलगा हेमंत भोसले आणि मुलगी वर्षा भोसले आज या जगात नाहीत. २०१५ साली हेमंत भोसले यांचं कर्करोगाने निधन झालं. तर आशा यांच्या मुलीने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. आनंद आशा यांचा तिसरा मुलगा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran singer asha bhosle s son anand bhosle is hospitalized in dubai dcp