Delhi Ganesh Passes Away : तमिळ सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते दिल्ली गणेश यांचं वयाच्या ८० व्या वर्षी चेन्नई येथे निधन झालं आहे. दिल्ली गणेश काही काळापासून वयोमानामुळे विविध आजारांनी त्रस्त होते. त्यांनी चेन्नईतील रामापुरम येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलगा महादेवन गणेश यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली.
महादेवन यांनी आज (१० नोव्हेंबर २०२४) सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करीत दिल्ली गणेश यांच्या निधनाची माहिती दिली आणि लिहिलं, “आम्हाला कळवण्यास दुःख होत आहे की, आमचे वडील दिल्ली गणेश यांचं ९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ११ वाजता निधन झालं.” दिल्ली गणेश यांच्यावर ११ नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.
हेही वाचा…कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
१९७६ मध्ये के. बालाचंदर यांच्या ‘पट्टिना प्रवेशम’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ते कमल हासनचे यांचे घनिष्ठ मित्र होते. अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केलं आहे. ‘अपूर्व सहोदरारगल’, ‘मायकेल मदना कामा राजन’, ‘अव्वई शन्मुखी’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
दिल्ली गणेश हे नाव त्यांना तमीळ दिग्दर्शक बालाचंदर यांनी दिलं. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी दिल्ली गणेश हे ‘दक्षिण भारत नाटक सभा’ या दिल्लीस्थित नाट्यसंस्थेचा भाग होते. त्याशिवाय त्यांनी १९६४ ते १९७४ पर्यंत भारतीय हवाई दलात सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
कमल हासन यांचा ‘इंडियन २’ हा दिल्ली गणेश यांचा शेवटचा चित्रपट होता. त्याशिवाय त्यांनी एक हिंदी वेब सीरिज केली असून, दिग्दर्शक-अभिनेता शशीकुमार यांच्या चित्रपटात काम केलं आहे, हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. आपल्या कारकिर्दीत दिल्ली गणेश यांनी विविध प्रकारच्या भूमिका सहजतेने साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला.