Veteran Telugu Actor Mohan Babu : ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते मोहन बाबू मांचू आणि त्यांचा धाकटा मुलगा मनोज मांचू यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू आहेत. बुधवारी सायंकाळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या घरी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी गेले असता मोहन बाबू यांनी व्हिडीओ कव्हरेज करणाऱ्या पत्रकाराचा माइक हिसकावून त्याच्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर दिग्गज टॉलिवूड अभिनेते मोहन बाबू ( Mohan Babu ) यांच्या अडचणीत वाढ झाली असून, याप्रकरणी मोहन बाबू यांच्यावर १० डिसेंबर २०२४ रोजी रंगारेड्डी जिल्ह्यातील जलपल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी एका पत्रकारावर हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली, जेव्हा सगळे पत्रकार अभिनेत्याच्या निवासस्थानी त्यांच्या कौटुंबिक वादाचे कव्हरेज करण्यासाठी गेले होते.

fti former president gajendra chauhan s
“नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, आता पंतप्रधान देणार”, ‘या’ अभिनेत्याच्या वक्तव्याने…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
Loksatta vyaktivedh Actress Demi Moore autobiography Inside Out
व्यक्तिवेध: डेमी मूर
manmohan mahimkar in financial trouble
ज्येष्ठ मराठी अभिनेत्याला काम मिळेना; खोली विकण्यासाठी कुटुंबीयांकडून दबाव, आर्थिक संकट अन्…; खंत व्यक्त करत म्हणाले…
Man beaten to death for not giving money for alcohol
पुणे :दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाचा खून; लोणी काळभोरमधील घटना
director Anurag Kashyap leave Mumbai financial pressures
विश्लेषण : प्रयोगशील दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याचा निर्णय का घेतला? त्याचे ‘दाक्षिणायन’ बॉलिवुडला जागे करणार का?

हेही वाचा : मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

पहारी शरीफ पोलिसांनी भारतीय न्यायिक संहिता (BNS) कलम ११८ (१) अंतर्गत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गेटवर बाऊन्सरशी झालेल्या वादानंतर मनोज मांचूने सुरक्षा कर्मचारी आणि पत्रकारांसह जबरदस्तीने घरामध्ये प्रवेश केल्याची घटना घडली. हे सर्व पाहून मोहन बाबू आक्रमक झाले आणि त्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप पत्रकाराने केला आहे. यावेळी त्याच्याकडून त्याचा माईक हिसकावून, हल्ला करण्यात आल्याने पत्रकाराला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर घरातील बाऊन्सर्सनी सर्व पत्रकारांना परिसर सोडण्यास भाग पाडलं. अभिनेते मोहन बाबू मांचू आणि धाकटा लेक मनोज यांच्यातील वाद काय आहे जाणून घेऊयात…

गेल्या काही दिवसांपासून मोहन बाबू मांचू ( Mohan Babu ) आणि धाकट्या लेकामध्ये मालमत्तेवरून वाद सुरू आहेत. ज्येष्ठ अभिनेत्याने या विरोधात मुलगा मनोज आणि सून मोनिकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच या दोघांपासून स्वत:ला धोका असल्यामुळे पोलीस संरक्षणाची मागणीही त्यांनी केली. मात्र, वडिलांनी केलेले हे सगळे आरोप निराधार असल्याचं मनोजने म्हटलं आहे.

हेही वाचा : छोटा पुढारी घन:श्यामने Bigg Boss मधून मिळालेल्या पैशांचं काय केलं? चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला…

मोहन बाबू मांचू ( Mohan Babu ) यांचा मुलगा मनोज देखील अभिनेता आहे. तो म्हणाला, “माझे वडील, केवळ माझी बदनामी करण्यासाठी, माझा आवाज दाबण्यासाठी आणि कुटुंबात मतभेद निर्माण करण्यासाठी असे आरोप करत आहेत मी कधीही मालमत्तेत वाटा मागितलेला नाही. मी मालमत्तेसाठी नाहीतर स्वाभिमानासाठी लढतोय.”

Story img Loader