चित्रपटांमधील ‘व्हीएफक्स’चा प्रभाव विसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात अधिक परिणामकारकपणे दिसून येऊ लागला असला तरी त्याची सुरुवात शंभर वर्षांपूर्वी झाली होती. तेव्हा उपलब्ध तंत्रज्ञान अतिशय अपुरं असलं तरी असामान्य प्रतिभा असणाऱ्या तत्कालीन चित्रकर्त्यांनी दृश्य अधिक परिणामकारक दाखविण्यासाठी त्याचा कल्पकतेने वापर केला. फ्रान्समधील ‘ट्रिप टु मून’ आणि भारतातील ‘कालियामर्दन’ ही त्याची ठळक उदाहरणे आहेत…

अगदी अनादी काळापासून गोष्ट सांगणे हा मनोरंजनाचा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. गोष्टीचा आशय आणि ती सांगण्याच्या पद्धतीवरून त्याचं मनोरंजन मूल्य ठरतं. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ ही प्राचीन भारतीय महाकाव्ये म्हणजे खूप छान गोष्टी आहेत. आपल्याकडे बहुतेक सर्वाना अगदी लहानपणापासून ही महाकथानकं माहिती असतात. पूर्वी घरातील वडिलधारी मंडळी विशेषत: आजी-आजोबा नातवंडांना रामाच्या, कृष्णाच्या, कौरव-पांडवांच्या गोष्टी सांगत. त्या छोटय़ा गोष्टींद्वारे अप्रत्यक्षपणे अगदी लहान वयातच मुलांना संक्षिप्त स्वरूपात का होईना या दोन महाकाव्यांचा परिचय होत असे. पुढील काळात ती जागा गोष्टीच्या पुस्तकांनी घेतली. ती वर्णनं वाचून वाचक त्या प्रसंगांचं चित्र डोळ्यासमोर उभं करत. कालांतराने या कथानकांना चित्रांची जोड दिली गेली. त्यातून संबंधित व्यक्तिरेखा मूर्त स्वरूपात साकारल्या जाऊ लागल्या. ‘कॉमिक्स’ हा त्याच्या पुढचा प्रकार. त्या चित्रमालिकांनी कथा अधिक स्पष्ट स्वरूपात सांगितली जाऊ लागली. चित्रपट, मालिका, अ‍ॅनिमेशन आदी अनेक माध्यमांमधून ही पौराणिक कथानकं अजूनही नियमितपणे दाखवली जात आहेत. सर्व साधारणपणे श्रोत्यांना/प्रेक्षकांना कोणतीही एक गोष्ट पुन्हा ऐकायला/पहायला आवडत नाही. मात्र ‘महाभारत’ आणि ‘रामायण’ त्याला अपवाद आहेत, कारण प्रत्येक कलावंत आपापल्या परीने त्या कथानकाचा वेगळा पैलू मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी त्या त्या काळात उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. आपल्याकडे दृकश्राव्य माध्यमात साधारण नव्वदच्या दशकात ‘व्हीएफएक्स’ तंत्राचा वापर सुरू झाला असला तरी अगदी चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळातही काही प्रमाणात का होईना कथानकातील घटना अगदी ठळकपणे प्रेक्षकांच्या मनावर ठसवण्यासाठी काही क्लृप्त्यांचा वापर त्यावेळच्या चित्रकर्त्यांनी केलेला दिसून येतो.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Sukh Mhanje Nakki Kay Asta fame Aparna Gokhale appear in savali hoin sukhachi serial
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री झळकणार आता नव्या भूमिकेत, पोस्ट करत म्हणाली, “माझी नवी मालिका…”
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल

दृकश्राव्य माध्यमाद्वारे पौराणिक अथवा काल्पनिक कथानकांमधील चमत्कृतीपूर्ण प्रसंग अधिक परिणामककारकपणे दाखविण्यासाठी ट्रिक सीन्सचा वापर केला जाऊ लागला. आताच्या ‘व्हीएफएक्स’चा तो सुरुवातीचा अवतार होता. १९०२ मध्ये फ्रेंच चित्रकर्ता जॉर्ज मेलियस याने त्याच्या ‘ट्रीप टु मून’ या सिनेमासाठी ट्रिक सीन्स वापरले. पृथ्वीवरील खगोलतज्ज्ञांची चंद्रावरील सहल असं या चित्रपटाचं स्वरूप होतं. पुढील काळात मानवाने चंद्रावर प्रत्यक्ष पाऊल ठेवलं. मात्र ज्याकाळात संगणक अथवा आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते, तेव्हा जॉर्जने अतिशय कल्पकतेने चांद्रसफारीचा देखावा चित्रपटातून दाखवला आहे. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी’ म्हणतात त्याचा प्रत्यय हा चित्रपट पाहिल्यावर येतो. त्याने त्यानंतरही अनेक चित्रपटांमधून अशा प्रकारच्या ट्रिक सीन्सचा वापर केला आहे. त्यामुळे त्याला व्हीएफएक्स युगाचा पितामह मानलं जातं. त्यानंतर हॉलीवूडमध्ये वैज्ञानिक संज्ञा आणि कल्पना यांचं बेमालूम मिश्रण असलेले अनेक भव्य दिव्य चित्रपट निर्माण झाले. मात्र तरीही ‘ट्रिप टु मून’चं महत्त्व कायम राहणार आहे. कारण तो ‘व्हीएफक्स’चा पहिला प्रयोग आहे.

हॉलीवूड चित्रपटांमध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून अशारीतीने व्हीएफक्सचा वापर होत असताना आपले भारतीय चित्रपटही मागे नव्हते. ‘ट्रीप टु मून’नंतर अवघ्या १७ वर्षांनी १९१९ मध्ये भारतीय चित्रपटांचे जनक मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांनी ‘कालियामर्दन’ चित्रपटाची निर्मिती केली. या मूकपटात बालकृष्णाच्या अनेक लीलांपेकी एक असलेल्या कालिया नागाच्या वधाची कथा दृश्यरूपात दाखविण्यात आली. छोटा बालकृष्ण दहा तोंडं असलेल्या महाकाय कालियाचा वध करतो, हे दादासाहेब फाळके यांनी या चित्रपटातून दाखवलं. त्यांचा हा प्रयोग भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला. वडिलधाऱ्यांच्या तोंडून ऐकलेली आणि पुस्तकांमधून वाचलेली ही कथा प्रथमच भारतीयांनी रूपेरी पडद्यावर जिवंत स्वरूपात पाहिली. दादासाहेब फाळके यांनी केलेल्या त्या पराक्रमाची लवकरच आपण शताब्दी साजरी करणार आहोत. जॉर्ज मेलियस आणि दादासाहेब फाळके दोघेही महान द्रष्टे होते. कारण सिनेमा या तेव्हा अगदी नव्या असणाऱ्या दृकश्राव्य माध्यमाचा परिणामकारकपणे गोष्ट सांगण्यासाठी किती कल्पकतेने वापर करता येऊ शकतो, हे त्यांनी दाखवून दिले. आता एखादी गोष्ट सादर करायची असल्यास अनेक संदर्भ, तंत्रज्ञान उपलब्ध आहेत. तेव्हा तसं काहीच नव्हतं. तरीही अंगभूत प्रतिभा, कल्पकता आणि क्लृप्ती यांचा वापर करून त्यांनी प्रसंग अधिक जिवंत स्वरूपात दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

vfxwalla@gmail.com

शब्दांकन- प्रशांत मोरे

Story img Loader