बॉलिवूडची सर्वाधिक चर्चेत राहणारी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा आजही होताना दिसते. दोघही राजस्थानच्या सवाई माधोपूर येथे लग्नाच्या बेडीत अडकली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लग्नाचा शाही थाट पाहून सर्वच थक्क झाले होते. त्याच्या या शाही लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा देखील झाली होती. पण आता विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जी ऐकून सर्वच हैराण झाले आहेत.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला जवळपास ३ महिने झाले आहेत. मात्र त्यांच्या या लग्नाबाबत अशी माहिती समोर आली आहे ज्यामुळे त्यांचे चाहतेही हैराण झाले आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले विकी आणि कतरिना यांनी सर्व रिती रिवाजांनुसार लग्न केलं असलं तरी या लग्नाला कायदेशीर मान्यता नव्हती. म्हणजेच विवाहित असलेल्या विकी आणि कतरिना यांचं हे लग्न कायदेशीर नव्हतं. काही रिपोर्टनुसार लग्नाच्या तब्बल तीन महिन्यानंतर म्हणजे अगदी अलिकडच्या काळात विकी आणि कतरिना यांनी त्याचं लग्न रजिस्टर केलं आहे.

आणखी वाचा- सलमाननं दिली होती चिरंजीवींचा ‘गॉडफादर’ सोडण्याची धमकी, मानधनावरून झाला होता वाद

पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार तीन महिन्यांपूर्वीच विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी शाही थाटात आणि पंजाबी पद्धतीने राजस्थान येथे लग्न केलं. मात्र त्यांनी त्याचं लग्न त्यावेळी रजिस्टर केलं नव्हतं. लग्नाच्या तीन महिन्यांनंतर या दोघांनी १९ मार्चला कुटुंबीयांच्या उपस्थिती पुन्हा एकदा कोर्टात लग्न केलं आणि लग्नाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. म्हणजे तीन महिन्यापासून विवाहित असलेले विकी कतरिना १९ मार्चला कायदेशीररित्या या विवाहबंधनात अडकले.

आणखी वाचा- कंगना रणौत अद्याप आहे अविवाहित; ‘ही’ व्यक्ती होऊ शकते आदर्श जीवनसाथी

दरम्यान विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये आपले कुटुंबीय आणि काही निवडक मित्र परिवाराच्या उपस्थिती लग्न केलं होतं. या लग्नाचा शाही थाट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. या दोघांच्या लग्नाचे फोटो तर सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले होते. त्यानंतरही दोघं सतत्यानं सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करताना दिसतात.

Story img Loader