बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल काही दिवसांपूर्वी लग्न बंधनात अडकले आहेत. हे दोघे ही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. लग्नानंतर आता विकी आणि कतरिना त्यांच्या नवीन घरात गेले आहेत. नवीन घरात गेल्यानंतर कतरिनाने विकी आणि त्याच्या कुटुंबासाठी गोड पदार्थ बनवला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
विकीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत विकीच्या हातात शीरा आहे. हा फोटो शेअर करत “आता पर्यंतचा सगळ्या अप्रतिम शीरा” असे कॅप्शन विकीने दिले आहे. तर असाच एक फोटो कतरिनाने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘मी बनवला’ अस कतरिना म्हणाली आहे. यासोबतच विकी कौशलच्या घरात ही विधी कोणत्या नावाने केली जाते याचाही उल्लेख करण्यात आला. तिने सांगितले की विकीच्या घरात या विधीला ‘चौका चारधाना’ म्हणतात.

आणखी वाचा : फोटो काढण्यासाठी आलेल्या पोलिसाला हटकल्यानंतर ; अक्षयने केलेल्या कृत्याचे होतयं कौतुक

आणखी वाचा : सुशांत सिंह राजपुतच्या बहिणीचा बोल्ड फोटो पाहिल्यानंतर नेटकरी संतप्त म्हणाले…
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाहसोहळा ९ डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये शाही थाटात पार पडला. ते दोघेही ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. पण हा संपूर्ण सोहळा ७ ते ९ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला होता. दरम्यान या लग्नात कुटुंबिय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. लवकरच हे दोघेही मुंबईत त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात असल्याचे बोलले जात आहे.