बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे. पण त्यातही त्यांच्या महिला चाहत्यांची संख्या जास्त आहे. विकी कौशलवर जीव ओवाळून टाकणाऱ्या तरुणींची संख्या काही कमी नाही. विकी कौशलनं कतरिनाशी लग्न केल्यानंतर अनेकांच्या पदरी निराशा पडली. पण काही महिन्यांपूर्वी असं काही झालं होतं की, एक तरुणी थेट त्याच्या घरी पोहोचली होती.

विकी कौशलनं एका मुलाखतीत हा किस्सा शेअर केला होता. तो म्हणाला, ‘घरी माझे आई-बाबा होते. बेल वाजली तसं माझ्या आईने दरवाजा उघडला. समोर एक मुलगी उभी होती. आईला वाटलं माझी कोणी मैत्रीण असेल जिच्या येण्याबद्दल सांगायला मी विसरलो. पण जेव्हा त्या मुलीनं सांगितलं की तिचं माझ्याशी फेसबुकवर बोलणं झालं आहे आणि मी तिला घरी भेटायला बोलवलं आहे तेव्हा माझ्या आई- वडिलांना धक्का बसला.’

विकी कौशल पुढे म्हणाला, ‘मी फेसबुक वापरत नाही हे माझ्या कुटुंबीयांना माहीत होतं. त्यानंतर त्यांनी त्या मुलीची चौकशी केली. त्यावेळी समजलं की, तिचं माझ्या नावाच्या खोट्या अकाउंटवर कोणाशी बोलणं झालं होतं. जे काही झालं ते खूपच विचित्र होतं.’

दरम्यान विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ महिन्याभरापूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या दोघींनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केलं. त्यांच्या शाही विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. तसेच त्यांचे फोटोही खूप व्हायरल झाले होते. मोजके नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित विकी- कतरिनाचा हा शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडला होता.

Story img Loader